डफळापूरमध्ये तरूणाची आत्महत्या
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे शेतकरी,व्यवसायिक असलेल्या तरूणांने गळपास लावून आत्महत्या केली.सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी (वय 34,रा.डफळापूर) असे मयत तरूणांचे नाव आहे.घटना शनिवारी मध्यरात्री घडली.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, डफळापूर येथील सिध्दरामेश्वर स्वामी हा शेती व सायकल दुरूस्तीचा व्यवसाय करतो.डफळापूर गावात त्याचे सायकल दुरूस्तीचे दुकान आहे.
शनिवारी तो नेहमीप्रमाणे सायकल दुकान बंद करून गावातील घरात जेवन करून शेतातील घरात झोपण्यासाठी गेला होता.मध्यरात्रीच्या सुमारास त्यांने घराला आतून कडी लावून दोन्ही हात स्व:बांधून घेत अँगलला गळपास लावून घेतला.सकाळी बराच वेळ तो घरी आला नाही व मोबाईलही स्विच ऑफ लागत असल्याने भावाने मळ्यात जावून पाहिले असता हा प्रकार समोर आला.
दरम्यान सिध्दरामेश्वर यांने सुसाट नोट लिहून ठेवली होती.
मी आईवर फार प्रेम करतो,मला तीसच वर्षे जगायचे होते,असा उल्लेख केल्याचे समजते.दरम्यान जत पोलीसांनी पंचनामा केला.सिध्दरामेश्वर यांने मोठ्या कष्ठाने स्व:ताच्या शेतीसह व्यवसायात चांगले बस्तान बसविले होते.
मात्र त्यासाठी बँक,माइक्रो फायनान्स,पतसंस्थेतून काढलेले कर्ज कोरोना लॉकडाऊनमुळे फिटत नसल्याचा दबाव त्यांच्या मनावर होता.त्या विवचेंतून त्यांने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज़ आहे.