विनाकारण फिरणाऱ्याची रँपिड अँटीजन तपासणी | उमदी पोलीसाचा गर्दी रोकण्यावर रामबाण उपाय
माडग्याळ,संकेत टाइम्स : जत पुर्व भागात कोरोनाचे रुग्ण सातत्याने समोर येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस सतर्क झाले आहेत.पार्श्वभूमीवर
त्याविनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई बरोबर रँपिड अँटीजन तपासणी करण्याचा रामबाण उपाय पोलीसांनी काढला असून या तपासणीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी रोकली जात आहे.
सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर हे थेट मैदानात असल्याने ठाण्याच्या हद्दीतील गावात गर्दीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे.शुक्रवारी प्रसिद्ध असणाऱ्या माडग्याळ आठवडा बाजार दिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मोठा फौजफाटा मैदानात उतरविला होता.यावेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.
तरीही विनामास्क, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 25 वाहनधारकांवर कारवाई करत 12,500 रूपये दंड वसूल केले.त्याशिवाय बेपर्वार्ह नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी अशा विना कारण फिरणाऱ्या 23 जणांची रँपिड अँटीजन तपासणी करण्यात आली.यात सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मात्र अशा कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्या तरूणांना मोठा चाफ बसणार आहे.सा.पो.नि.कोळेकर,
उपनिरिक्षक नामदेव दांडगे,हवलदार एस.बी.वळसंगकर,राम बन्नेनवर,विक्रम घोदे,सिध्देश्वर मोरे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी तपासणी मोहिम
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.नागरिकांना विनाकारण फिरू नका असे आम्ही सातत्याने आवाहन करत आहोत.तरीही काही बेफीकीर तरूणांचा रस्त्यावर वावर चिंताजनक आहे.त्यामुळे अशांना रोकण्यासाठी आम्ही रँपिड अँटीजन तपासणी करण्याची मोहिम राबविली आहे.यामुळे गर्दी रोकणे शक्य झाले आहे.माडग्याळ, संख,कोंतेबोबलाद,उमदी अशा ठिकाणी स्थानिक आरोग्य यंत्रणाच्या सहकार्यामुळे गर्दीवर किंबहुना कोरोनाचा संसर्ग रोकण्याचा आमच्या प्रयत्न सुरू आहे.
– दत्तात्रय कोळेकर
सा.पोलिस निरिक्षक,उमदीउमदी
माडग्याळ ता.जत येथे पोलीसाकडून कडक कारवाई करण्यात आली.