लॉकडाऊनचा गैर फायदा, किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लुट

0



जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

मात्र या लॉकडाऊन मध्ये जिवानवश्यक वस्तूसह,भाजीपाला विक्री सुरू आहे.मात्र या लॉकडाऊनचा गैरफायदा व्यापारी आणि किराणा दुकानदार घेत आहेत. रोजच्या लागणाऱ्या अन्नधान्यांची किमंत आता प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांनी  

व्यापाऱ्यांनी वाढविली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.



Rate Card




मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन

सदृश निर्बंधाची घोषणा केली. त्यांचे भाषण संपण्याआधीच लोकांनी दुकानांवर खरेदीसाठी तोबा गर्दी केली. चार तासांत लोकांना दुकानदारांनी लुटले. त्यानंतरही हा प्रकार सर्रास सुरूच आहे. आता साखर, तेलाच्या दरात नेहमीपेक्षा 20 ते 30 रुपयांनी वाढ केलेली आहे.
वस्तु पूर्वीचे दर आताचे दर
साखर : 35 42 (कि.)
सोया, पामतेल : 100-124 (बॅग)
रेग्युलर तांदुळ : 40-50 (कि.)
शेंगदाणे :140 -150 (कि.)
तूरदाळ : 120-150 (कि.)
गहू :25-30 (कि.)
यावर काही छोट्या दुकानदारांनी आपले मत मांडले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.