करजगीत कोविड लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद

0



करजगी,संकेत टाइम्स : करजगी (ता.जत) येथे कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी व मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.





करजगी उपकेंद्रात सोमवार,व मंगळवार असे दोन दिवस 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या आठवड्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.






नागरिकांना ग्रामपंचायती कडून आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरणाची सुरूवात सरपंच साहेबपाशा बिराजदार, उपसरपंच साबू बालगाव यांच्या उपस्थितीत करण्यात आली.दरम्यान लसीकरण केलेल्या नागरिकांना किरकोळ ताप,अंगदुखी होऊ शकते,म्हणून औषधेही देण्यात आली.

Rate Card





लसीकरण केलेल्या नागरिकांना उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र को.बोबलाद अंतर्गत करजगी उपकेंद्र मधील समुदाय अधिकारी सौ.विजयलक्ष्मी बसर्गी,हनुमंत मेडीदार,आरोग्य सेवक परशुराम सूर्यवंशी,सौ.सुरेखा राठोड यांनी नियोजन केले.



करजगी ता.जत येथे कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.