जतच्या प्रभारी तहसीलदाराचा दणका | विना परवाना सुरू दुकाने सील ; दोन दिवसात 16 दुकानावर कारवाई

0
0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही गार्भिर्य न घेता जत शहरासह डफळापूर, बिळूर अशा प्रमुख गावात परवानगी नसलेली दुकाने चालू ठेवून जमाव बंदी आदेशाची पायमल्ली करणाऱ्या जत शहर,डफळापूर, बिळूर येथील दुकाने सील करत जतचे प्रभारी तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी दणका दिला आहे.






जत तालुक्यात कोरोनाचे दररोज शेकड्याने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.संपूर्ण तालुकाच हायरिस्कवर पोहचला आहे. प्रशासनाकडून सातत्याने शासनाचे निर्बंध काटेकोर पाळण्याचे आदेश देण्यात येत आहेत.तरीही काही व्यापारी परवानगी नसतानाही दुकाने उघडे ठेवून जमावबंदी आदेश मोडत आहेत.





यासंदर्भात प्रभारी तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या.त्यानुसार प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हेत्रे यांनी सोमवारी डफळापूरमध्ये 5, जत‌ येथे 8 धडक कारवाई करत दुकाने सील केली. तर मंगळवारी बिळूर येथे 3 दुकाने सील करत चांगलाच दणका दिला.तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या पर्यत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे कडक निर्बंध हाच पर्याय उरला आहे.शासनाचे कडक आदेश असतानाही काही व्यापारी,नागरिक हालगर्जीपणा करत‌ आहेत.त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा विळखा दररोज घट्ट होत आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here