जमावबंदी आदेश मोडणारी डफळापूर,जतमधील 9 दुकाने सील

0
जत,संकेत टाइम्स : डफळापूर,जत येथे जमावबंदीचा आदेश डावल्या प्रकरणी नऊ दुकाने सील केले आहेत.जतचे तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.तालुक्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.शासनाने कडक निर्बंध घातले आहेत.तरीही बेपर्वार्ह व्यापारी दुकान उघडून गर्दी करत आहेत.डफळापूर व जत येथील अशा गर्दी झालेल्या या दुकानावर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी धडक देत गर्दी असणारी दुकाने सील करत दणका दिला.जत येथील अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली विनापरवाना,शब्बीर नदाफ यांचे अशोक गादी & फर्निचर,महाराणा प्रताप चौक,संगाप्पा माळी यांचे न्यु. आशापुरी भांडी सेंटर,महाराणा प्रताप चौक,राम तुकाराम वनारसे,यांचे गुरूकृपा टेलर्स चावडीजवळ,कृष्णा नानासो जाधव यांचे अमर टेलर्स तेली गल्ली,याठिकाणी अचानक भेट दिली Rate Card
असता अत्यावश्यक सेवा वगळून सुरू असलेली दुकाने असलेमुळे सदरची दुकाने तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखालील पथकामार्फत सील करण्यात आली.दरम्यान डफळापूर मुख्य बाजार पेठेतील पाच दुकाने सील करत कडक कारवाईचा इशारा तहसीलदार म्हेत्रे यांनी दिला.

जत येथील विना परवाना उघडलेली दुकाने तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी सील केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.