शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करा ; दिगंबर सावंत

0



जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे तरी शिक्षकांचे वेतन  सीएमपी प्रणालीद्वारे करावे अशी मागणी शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे इ.मेल द्वारे केली आहे,शिक्षकांचे वेतन  दोन दोन महिने वेतन विलंबाने होत आहे.

    




राज्य शासनाने सण 2013 पासून शिक्षकांचे वेतन 1 तारखेला व्हावे,म्हणून शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देयके जमा करण्यास सुरुवात केली आहे.शासनाच्या धोरणानुसार वेतन देयके धनादेश विरहित करायची असल्याने स्टेट बँकेशी करार करून जिल्हा कोषागरातून प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्यासाठी सीएमपी कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या प्रणालीद्वारे अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार होती,त्यामुळे शिक्षकांचे पगार 1 तारखेला होऊ शकतो.

       

Rate Card




परंतु शालार्थ प्रणाली अपडेट न केल्याने तिचा वापर केवळ बजेट मागणीसाठी होत आहे.सीएमपी प्रणाली कुठे ही कार्यान्वित नसल्याने बजेट असून ही पगार विलंब होत आहे.राज्यात सेवार्थ मध्ये सीएमपी प्रणालीचा करून चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचे वेतन वेळेत होत आहे.याबाबतची मागणी यापूर्वी शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष महेश शरणाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ , बालम मुल्ला, विकास वायदंडे , महेशकुमार चौगुले यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी मुख्य वित लेखाधिकारी यांच्याकडे केली आहे.आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांच्याकडे शालार्थ प्रणाली अद्यावत होऊन शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करण्याची मागणी केली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.