जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट | तब्बल 97 नवे रुग्ण ; जत शहर,बनाळी,येळवी,माडग्याळ,बिळूर,अमृत्तवाडी,वाळेखिंडी हायरिस्कवर

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी कोरोनाचा विस्फोट झाला.तालुक्यात तब्बल 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे,सोमवारी शहरात पुन्हा नवे 25 नवे रुग्ण आढळल्याने शहर धोकादायक बनले आहे.


तालुक्याच्या ग्रामीण गावातील 20 गावात रुग्ण आढळून आले आहेत. तर लगतच्या विजापूर,मंगळवेढा,

पंढरपूरमधील 7 रुग्ण आढळले आहेत.तर तालुक्यातील 30 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात बेपर्वार्ह नागरिक अजूनही सावध होताना दिसत नाहीत.सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे तालुक्याची चिंता वाढली असून बेड,ऑक्सीजन,रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे रुग्णाची स्थिती चिंता वाढवणारी ठरत आहे.तालुक्यात सध्या 469 रुग्ण उपचाराखाली आहेत.

Rate Card


तालुक्यात सोमवारी केलेल्या तपासणीत जत‌ शहर 25,शेड्याळ 1,बनाळी 7,जाळीहाळ बु.1,गिरगाव 1,येळवी 6,माडग्याळ 6,कुणीकोणूर 2,दरिकोणूर 1,शेगाव 4,बिळूर 6,रेवनाळ 2,अमृत्तवाडी 10,कांसलिंगवाडी 1,बसर्गी 1,येळदरी 1,उमदी 1,वाळेखिंडी 9,करजगी 1,संख 1,वळसंग 1,अचनहळ्ळी 1,पंढरपूर 1,मंगळवेढा‌ 5,विजापूर 1 येथे नवे रुग्ण आढळले आहेत.


यात जत शहरासह बनाळी,येळवी,माडग्याळ, बिळूर,अमृत्तवाडी,वाळेखिंडी ही गावे हायरिस्कवर आहेत.अजूनही जत,डफळापूर सारख्या गावात नागरिक, व्यापारी बेजबाबदार पणे वागत आहेत.यामुळे कोरोनाचा विस्तार तर होत आहेच,त्याचबरोबर त्यांच्या स्व:तासह कुंटुबाला धोक्यात घालत आहेत.प्रत्येकांनी सावधानता बाळगणे क्रमप्राप्त बनले आहे.कोरोनाचा विखारी विषाणू कुठल्याही वेळी जीवघेणा ठरणार हे निश्चित आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.