बेलगाम नगरपरिषदेचा भोगळ कारभार पुन्हा उघड | ऐन टंचाईत‌ लाखो लिटर पाणी वाया

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील सर्वात मोठे ऐतिहासिक शहर असलेल्या जत नगरपरिषद प्रशासन बेलगाम झाले असून नेते,नगरसेवकांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने जत शहराला समस्यांनी वेढले आहे.नुकताच भोगळ कारभाचा प्रत्यय आला.शहरातील शिवाजी चौकात फुटलेल्या पाईपलाईनला गेल्या चार दिवसापासून दुरुस्त न केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया घालविले आहे.


जत शहराची नगरपरिषद कायम चर्चेचा विषय ठरत आहे.नगरपरिषदेला गेल्या दोन महिन्यापासून मुख्याधिकारी नाही,नगराध्यक्ष,नगरसेवकांना प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी दखलपात्र समजत नाहीत,किंबहुना त्यांना दखल घ्यावी,अशीही मानसिकताही या पदाधिकाऱ्यांची नाही.याचे सातत्याने स्पष्टता होत आहे.कसे पैसे मिळतील अशी मानसिकता असलेले लोक जत शहराचा विकास करतील,अशी आशा नागरिकांनी बाळगू नये असे म्हणायची वेळ आली आहे.


जत शहरात प्रश्न कधीच सुटलेले नाहीत,हे विशेष फुटके रस्ते,गटारी, सातत्याने फुटत असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईन,शहरासह अनेक कॉलनातील घाणीचे साम्राज्य,अतिक्रमणाचा विळखा,विद्रुपीकरण,वाहतूक कोंडी, विज,कमी दाबाचा तोहि दूषित पाणी पुरवठा,कार्यालयातील मगरूर अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची हेळसाड हाच काय जतचा विकास असा सवाल नागरिक विचारत आहेत.

 Rate Cardनुकताच नगरपरिषदेच्या नव्या भोगळ कारभाराचा प्रत्यय आला.जत शहरातील भारती वस्तीगृहाच्या कॉर्नरला गेल्या आठवड्यात पाणी पुरवठ्याची पाईपलाईन किरकोळ लिकेच झाली होती.याबाबत अनेक नागरिकांनी नगरसेवक व कार्यालयाला कल्पना दिली होती.गेल्या चार दिवसापुर्वी पाईपलाईन जोडणीसाठी खड्डा खणण्यात आला होता.तो तब्बल चार दिवस मुख्य रस्त्यावर तसा जीवघेणा ठेवण्यात आला होता.

दरम्यान रविवारी या ठिकाणी असणारे छोटे लिकेज मोठे झाले व मुख्य पाईपच फुटला त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.अनेक भागात पाण्यासाठी पळापळ करणाऱ्या नागरिकांना हे पाणी पाहून पोटात गोळा आला,मात्र करणार काय कोनाला,सांगायचे दु:ख असे म्हणत त्यानी आपला मार्ग धरला.

दरम्यान येथूनच अनेक पदाधिकारी, नगरसेवक,अधिकारी,कर्मचारी व नव्याने नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बांशिग बांधलेले अनेकजण जा-ये करतात.मात्र त्यांना हे लिकेज,किंबहुना खड्डाही दिसला नाही हे विशेष,शहरातील अनेक भागात‌ पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत असताना लाखो लिटर पाणी वाया घालविण्याचे पाप कुणाचे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

एक फंटर कर्मचाऱ्यांच्या तालावर पदाधिकारी, नगरपरिषदेचा डोलारा


जत नगरपरिषदेला वालीच उरला नसल्याचे स्पष्ट आहे.प्रत्येकजण माल मिळविण्यात गुंग असल्याने समस्या मांडायच्या कुणापुढे असा प्रश्न आहे.त्यापलिकडे जात नगरपरिषदेचा एक कर्मचारी पदाधिकारी,कनिष्ठ अधिकारी,कर्मचारी यांना आपल्या अनुभवावर कमाई करून देत‌ असल्याने त्यांच्या तालावर सर्वजण डुलत असल्याचे आरोप आहेत,विशेष म्हणजे‌ या कर्मचाऱ्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ विशेष कार्यालय स्थापण्यात आल्याची चर्चा आहे.येथूनच कमाईचे स्रोत दाखविले जात असल्याचे आरोप आहेत.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.