दरिबडचीत धारदार शस्ञाने वार करून तरूणाचा खून

0जत,संकेत टाइम्स : दरीबडची (ता.जत) येथील वीस वर्षीय तरुणाचा डोके,कानावर धारदार शस्ञाने वार करून निर्घुणपणे खून करण्यात आला आहे.खून झालेल्या तरुणाचे नाव धनाजी भागप्पा टेंगले (वय 19,रा.दरीबडची

करेवस्ती) असे आहे.नातेसंबंधातील मुलीशी लग्न करू नये या कारणावरून संशयिताना हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. पोलिसांना गतीने तपास करत दोघा संशयिताच्या मुसक्या आवळत‌ ताब्यात घेतले आहे.याबाबत मयत धनाजीचे वडील भागाप्पा टेंगले यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जत पोलिसात फिर्याद दिली आहे. राजू लेगरे व आदिनाथ हाक्के (पांढरेवाडी) असे दोघा संशयितांची नावे पोलीस तपासात समोर आली आहेत.


याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत धनाजी टेंगले
याचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ही मुलगी संशयित आरोपी राजू
लेंगरे यांच्या नातेसंबंधातील आहे. या मुलीशी लग्न करू नये म्हणून राजू
लेंगरे व मयत धनाजी टेगले यांचात वाद झाला होता.गुरुवारी रात्री आठ वाजता मयत धनाजी टेंगले हा दूध घालण्यास
दरीबडची येथे गेला होता.परंतू तो रात्री साडेनऊ वाजले तरीही आला नाही
म्हणून घरातील व्यक्तींनी शोधा शोध सुरू केली.

Rate Card


यावेळी धनाजीचा मृतदेह 
दरीबडची कुळालवाडी या रस्त्यालगत घरापासून अर्धा किलोमीटरील

अंतरावरील पल्हाद दऱ्याप्पा करे यांच्या शेतात आढळून आला.घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक आगतराव मासाळ, उमर फकीर, लक्ष्मण बंडगर, बाबू पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाचा‌पंचनामा केला. 

मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करत,गावातील 10 ते 12 तरुणांना रात्री चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.यातील दोघा संशयिताकडे कसून चौकशी केली असता,नातलगांतील मुलीशी लग्न करू नये अशी राजू लेंगरे यांचे म्हणणे होते, यातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती चौकशीत निष्पन्न झाली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.