डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास विश्वजीत कदम यांची भेट

0

डफळापूर, संकेत टाइम्स : जत  तालुक्यातील डफळापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट देऊन कोरोना लसीकरण मोहीमेबद्दल माहिती घेतली. तसेच जास्तीत जास्त जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे,याबद्दल काही सूचना दिल्या. यावेळी कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात ऑक्सिजन बेडची पाहणी केली. 


यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर उपस्थित होते.Rate Card
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांनी केंद्रासह संलग्न उपकेंद्रात कोरोना बाबत सुरू असलेल्या उपाययोजना लसीकरणाची माहिती मंत्री पाटील यांना दिली.केंद्रात तात्काळ उपचाराची सोय करण्यात येते,कोरोना जास्तीत जास्त तपासण्या सुरू आहेत.अन्य आजारावर, प्रस्तूती सुरू असलेल्या कामांचीही माहिती मंत्री कदम यांना देण्यात आली.

सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.