डफळापूरमध्ये आजपासून शासन आदेशाची कडक अंमलबजावणी

0

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे आजपासून राज्य शासनाच्या आदेशाचे कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसात डफळापूरमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.व्यापारी नागरिकांना सातत्याने सुचना देऊनही त्यांच्याकडून सहकार्य होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान शुक्रवारी डफळापूर ग्रामपंचायतीत दक्षता कमिटीची बैठक झाली.यावेळी गावात निर्बंध कडक करण्याच्या सुचना विस्तार अधिकारी श्री.चव्हाण यांनी दिल्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.चालू दुकानांना सोशल डिस्टसिंग पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.त्याशिवाय शनिवार-रविवार कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.Rate Card

मास्क,सँनीटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दोनशे रूपये दंड आकारण्यात येणार आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांना 5 हजार रूपये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.‌कुठेही कोरोना सदृश लक्षणे आढळून आलेले किंवा बाहेरून आलेल्या नागरिकांना आरोग्य केंद्रात तपासणी करावी,कोरानाची महामारी रोकण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन संरपच बालिकाकाकी चव्हाण यांनी केले आहे.

डफळापूर ग्रामपंचायतीत दक्षता कमिटीची बैठक संपन्न झाली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.