कोरोना : स्थिती चिंताजनक‌ | आपले आरोग्य ही आपली जबाबदारी, निर्बंधाचे पालन करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0



सांगली :  कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड मोठ्यागतीने वाढत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. बेड ऑक्सिजन व अन्य अनुषंगिक वैद्यकीय सुविधा या आजच्या घडीला पुरेसा असल्या तरी या सर्व यंत्रणांना मर्यादा आहेत. याची गंभीरता लक्षात घेऊन आता प्रत्येकानेच स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. 



कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वेातरी प्रयत्नशिल आहेच पण स्वत:चे आरोग्य ही स्वता:ची देखिल जबाबदारी आहे याची जाणिव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटाझरचा वापर,  सामाजिक अंतर या बाबींचे पालन तर कराच पण प्रामुख्याने गर्दी टाळा, अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. 



या बरोबरच ज्या अत्यावश्यक सेवांना, बाबींना शासनाने परवानगी दिली आहे. अशा ठिकाणीही कोव्हिड प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या निर्बधांचे काटेकोर पालन न झाल्यास त्याही सेवा बंद केल्या जातील व दंडात्मक कारवाई केली जाईल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            




जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोरोना उपचारासाठी आरक्षित केलेल्या खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचे सांगून, रेमडेसिव्हर औषधाचा काळाबाजार टाळण्यासाठी जिल्ह्यात अंत्यत प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आजच्या घडीला जिल्ह्यात रेमडेसिव्हरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या औषधाचा तुटवडा टाळण्यासाठी आवश्यक भासल्याच रुग्णालयांनी याचा वापर करावा. 


Rate Card





अनावश्यकपणे रुग्णाला रेमडेसिव्हरच्या मात्रा देण्यात येवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ज्या हेल्थ केअर वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर्स यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे. त्यांनी तो तात्काळ घ्यावा. असे आवाहन केले.

            




जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 59 हजार 997 जणांना कोरोनाचा डोस देण्यात आला असून यामध्ये 3 लाख 36 हजार 072 जणांना पहिला तर 23 हजार 925 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात दिवसाला सुमारे 20.800 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा कोराना उपचारासाठी करावा लागतो. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची टक्केवारी वाढत असून ही टक्केवारी दिनांक 5 ते 11 एप्रिल 2021 अखेर  13.38 पर्यंत  पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना उपचारासाठी 41 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उपलब्ध आहेत. तर 14 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यरत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.