ग्रामीण भागात कोरोनाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाचे दुर्लक्ष

0



वळसंग,संकेत टाइम्स : जत तालुक्यात विकेंड लॉकडाऊन करून ही रुग्णसंख्येत घट दिसत नाही,आजपासून कडक संचारबंदी करण्यात आली आहे.दुसरीकडे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे.ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना जंतुनाशक, किंवा कोरोनाच्या बाबतीत उपाययोजना करणे प्रत्येक ग्रामपंचायतचे कर्तव्य असताना अजून सकारात्मक हालचाल नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.





अँटीजन टेस्ट व कोरोना प्रतिबंधक लसीकरण वर जोर देत रुग्णाच्या वाढीवर निर्बंध लागायला हवे पण वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याबरोबर जत तालुक्यातील रुग्ण वाढीला क्रमांक दोन लागतो.आरोग्य विभाग आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने यात लक्ष घालून योग्य ती उपाययोजना न केल्यास तालुक्यात भयावह परिस्थिती ओढवण्याची शंका आहे.


Rate Card





 जत शहर सोडल्यास उपरोक्त निर्बंध ग्रामीण भागात कमी पाळले जातात असे असताना रुग्ण साहजिक वाढीस वेग निर्माण होईल व तालुका हॉटस्पॉट होईल.त्यामुळे कडक नियमांचा लॉकडाऊन गावोगावी लावला लागेल. यासाठी ग्रामपंचायतने गावच्या सुरक्षा व उपाययोजना म्हणून जंतुनाशक फवारणी  करून रुग्ण संख्येच्या वाढीला तूर्तास फुलस्टोप लावता येईल अन्यथा कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव जनतेला त्रासदायक ठरू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.