ज्ञानू माने यांचे 101व्या वर्षी निधन
हिवरे,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील हिवरे येथील ज्ञानू महादेव माने यांचे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले,निधनावेळी त्यांचे वय 101 वर्ष होते,ते हिवरे व पंचक्रोशीतील जनावरांच्या मोडलेल्या अवयवांवरती व माणसांच्या हातापायांच्या वरती इलाज करणारे नामांकित वैद्य म्हणून परिचित होते, सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा माने यांचे व सांगली पोलीस हवलदार विठ्ठल माने यांचे पिताश्री होत.
पश्चात चार मुले,चार मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पुर्वापार चालत आलेली आयुर्वेदिक उपचार करणारे ज्ञानू माने यांची उणिव सातत्याने परिसरात भासणार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी दि.13 एप्रिल रोजी सकाळी 8.00 वाजता हिवरे येथे होणार आहे.
