बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारे ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमिताने अभिवादन

0

सांगली : बहुजनांना मनुवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारक व उद्यान येथे ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक शिवाजी त्रिमुखे, राजेश सोनावणे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

ज्योतिबा फुले, हे लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. 


त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील व देशातील अस्पृश्य समाज तसेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्ध महात्मा फुले व क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांनी लढा दिला. मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी फुले यांनी हंटर कमिशन पुढे आपली भूमिका मांडली. 


Rate Card

मिरज रोडवरील महात्मा फुले स्मारक व उद्यान प्रचंड दुरवस्थेत आहे, याबाबत काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमोल वेटम यांनी आवाज उठवला. या ठिकाणी असलेल्या पुतळ्याची वाईट अवस्था आहे, केर कचरा, घाण पाणी या उद्यानात साठलेले आहे. 

फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी प्रशासनास, आयुक्तांना वेळ नाही.  याचा आम्ही निषेध करतो. *तत्काळ या स्मारकाची उद्यानाची दुरुस्ती होऊन या ठिकाणी ग्रंथालय बनवण्यात यावे, नवीन पुतळा बसविण्यात यावे, हीच खरी आदरांजली ठरेल, असे अमोल वेटम म्हणाले*.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.