कोविड-19 तक्रार निवारण कक्ष स्थापन

0सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्ह्यामध्ये दररोज पॉझिटीव्ह रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रूग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय हॉस्पीटल अधिग्रहीत करण्यात आली आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या रूग्णांमध्ये लक्षणे असलेली व नसलेली हे दोन्ही रूग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी त्या अनुषंगाने रूग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर बेड उपल्बतेबाबत व तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) सुरू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हास्तरावर पुढीलप्रमाणे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. (1) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (महानगरपालिका) संपर्क क्रमांक 0233-2375500 व 0233-2374500. (2) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (जिल्हा परिषद) संपर्क क्रमांक 0233-2374900 व 0233-2375900. (3) तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) क्रमांक 1077.

 

 

 

Rate Card

 

 

 

 

 

 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.