जत तालुक्यात कोरोनाचे नवे 36 रुग्ण, तेवढेच कोरोनामुक्त | एकाचा मुत्यू, वाचा गावानिहान रुग्ण संख्या..
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी 36 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे.
शुक्रवारी करण्यात आलेल्या तपासणीत जत शहर 14,दरिबडची 2,निगडी 1,बनाळी 1,पाच्छापूर 1,राजोबाचीवाडी 1,अंकलगी 1,को-बोबलाद 1,कोसारी 1,शेगाव 1,बालगाव 1,व्हसपेठ 1,डफळापूर 4,अंकले 2,बिळूर 4 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील संख्या 2580 झाली असून सध्या 2247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील एका रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. तालुक्यात 35 शनिवारी कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 255 जण उपचारा खाली आहेत.