माझे‌ राजकीय आयुष्य संपविण्याचा प्रयत्न | विरोधी पक्ष नेते विषयावर विजय ताड काय म्हणाले,वाचा…

0जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलो आहे,पक्ष वाढविण्यासाठी स्वच्छ प्रयत्न केला आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काही पक्षाला बदनाम करणाऱ्या लोकांचे ऐकून माझी सोशल मिडियावर घटनात्मक पद नसलेल्या विरोधी पक्ष नेते पदावरून काढल्याचे पत्रक काढून माझे राजकीय आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला आहे.अशा प्रकारे माझी बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार बैठकीत दिली.


भाजपा नगरसेवकांनी बैठक घेत ताड यांना विरोधी पक्ष नेते पदावर हटविल्याचे पत्रक काढले आहे.त्यावर ताड बोलत होते.

ताड म्हणाले,मी गेल्या तीन वर्षात वारवांर स्वच्छता, पाणी पुरवठा,हिंदू स्मशानभूमी,अतिक्रमण,डेंगू,मलेरिया सह अनेक नागरिकांच्या विषयावर तिरडी मोर्चा,टाळे टोकणे अशी आंदोलन करून नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आमचे नगरसेवक,नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.


उलटपक्षी गेल्या तीन वर्षापासून स्विकृत्त नगरसेवक मिरविणाऱ्यांनी आपल्या विविध कृत्यांने पक्षाला बदनाम केले आहे. ठरल्या प्रमाणे राजिनामाही दिलेला नाही.

ताड ‌म्हणाले,मी सातत्याने पक्ष वाढीसाठी काम केले आहे, पुढेही करणार आहे. राज्यात भाजपाकडून राष्ट्रवादी कॉग्रेसचा समाचार घेतला जात असताना जतमध्ये आमचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादीच्या नेत्याबरोबर बैठका घेत,एकत्रित काम करण्याची भर कार्यक्रमात घोषणा करत आहेत हे पक्ष विरोधी ठरत नाही काय?

Rate Card

विकास कामासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांना भेटलो म्हणून मला पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून बदनाम केले जात आहे.उमेश सांवत सारख्या स्विकृत्त नगरसेवकांकडून वाळू तस्करी,अनेकवेळा केलेल्या वादावादीच्या प्रकारामुळे पक्ष बदनाम झाला असतानाही त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून पाठिंशी घातले जाते.माझ्यावर आरोप करत घटनात्मक नसलेले पद घालून घेतले म्हणून बदनामी करत माझे राजकीय आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मी याबाबत‌ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे.जिल्हाधिकारी यांचीही भेट घेतली असून भाजपा कडून निवडून आलो आहे,भाजपचे काम करणार असल्याचे ताड यांनी शेवटी सांगितले.

राजीनामा यापुर्वीच दिला


आमच्या वरिष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितल्या नुसार मी विरोधी पक्ष नेते पदाचा 20 जानेवारीला राजीनामा त्यांच्याकडे दिला आहे. असे असताना मला काढून टाकल्याचे प्रोसेडिंग करून बदनामी करण्याची षडयंत्र गटनेत्या श्रीदेवी जावीर,उमेश सांवत,प्रकाश माने यांच्याकडून रचण्यात आले आहे.यापुढे त्यांना तशास तसे उत्तर देऊ,असेही ताड‌ यांनी सांगितले.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.