मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती

0



Rate Card

मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे.मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे.

असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही.
एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते. 
अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव,पॅलेसोमिया,रक्तक्षय,रक्ताचा कर्करोग,प्रसुती पश्चात रक्तस्त्राव आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचवु शकतात.कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही,त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात ते आठ लाख बाटल्या रक्त लागते.


ही गरज 70 ते 75 टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी.मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ 300 मिलि.रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण 48-72 तासामध्ये शरीरात रक्ताची पातळी पुर्ववत होते.तसेच साधारण 2 ते 3 आठवड्यांमधे रक्तपेशीही पुर्ववत होतात.

रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.रक्तदान केल्यानंतर 20 ते 30 मिनीटे विश्रांती नंतर ती व्यक्ती पुर्ववत काम करु शकते. रक्तदान करण्यासाठी साधारणतः 18 पेक्षा जास्त व 60 पेक्षा कमी वय लागते. वजन 50 कि,ग्रॅ पेक्षा जास्त हवे. हिमोग्लोबिन 12.5 टक्के पेक्षा जास्त असावेत. काविळ,मलेरिया,टायफ़ाइड, डेंग्यु,चिकनगुनिया,एका वर्षामधे कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास,अँनेमिया,कुष्ठरोग,कर्करोग,उच्च रक्तदाब,मधुमेह यासारखे काही असह्य आजार किंवा वयोपरत्वे आजार असल्यास रक्तदान करु नये.


तसेच रक्तदाताच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना नाकारले जाते,
सध्या कोरोनाच्या संकटात सापडलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अनेक रक्तपेढीत रक्त अल्प प्रमाणात उपलब्ध आहे,राज्यातील रक्ताचा साठा जमतेम काही दिवसच पुरेल एवढाच शिल्लक आहे त्यामूळे रक्तदातांनी पुढे येऊन रक्तदान करणे खूप गरजेचे बनले आहे,


राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे तसेच आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे साहेब वारंवार रक्तदानासाठी आव्हान करत आहेत.आपण ही एक सजग नागरिक या नात्याने मनात कसलीच भीती न बाळगता पुढे येऊन रक्तदान करून कोणाचा तरी अमूल्य जीव वाचवावा हीच अपेक्षा.

-अजय अंधारे,
तिर्थपुरी,घनसावंगी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.