भिवर्गीतील मंजूर बंधारे बांधावेत

0भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी (ता.जत) येथील बोर नदी पात्रात बांधण्यात येणारे बंधारे अनेक दिवसापासून रखडले आहेत.बोर नदीपात्रात‌ भिवर्गी हद्दीत‌ सुमारे 4 बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.ते तात्काळ बांधावेत अशी मागणी भिवर्गीचे सरपंच मदगोंड सुसलाद उपसरपंच बसवराज चौगुले यांनी केली आहे.भिवर्गीतील बिलेनिसिद्दा पुजारी व साधू कोकरे यांच्या शेताला लागून (पांडोझरी वरून येणारं नदीजवळ),रामू चलवादे व कौदेश मुंडेवडी यांच्या शेताला लागून (संख बोर नदी),भिवर्गी आणि करजगी सीमा लागून (संख बोर नदी),अमसिद्ध तोदलबगी व विठ्ठल करे शेताला लागून (तिकोंडी वरून भिवर्गी तलावला येणारं नदीत) अशा चार बंधाऱ्याला मंजूरी मिळाली आहे.मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी संपत आला तरीही बंधाऱ्याचे काम रखडले आहे.याकडे तालुका जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या वरदान ठरणारे हे बंधारे तातडीने बांधावेत,अशी मागणी करण्यात येत आहे.

Rate Card


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.