कोरोनाच्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये आणखी काही अत्यावश्यक सेवांचा समावेश

0
1

 



सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास आळा बसण्यासाठी दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये  प्रतिबंधात्मक आदेश दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत पारित करण्यात आला आहे. राज्य शासनाने दि. 4 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये काही अत्यावश्यक सेवा म्हणून अतिरिक्त बाबींचा समावेश केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 5 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये पुढील बाबींचा समावेश केला आहे.



(१)              अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. (अ) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने,  (ब) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा (क) डेटा केंद्रे, क्लाउड सेवा वितरक, पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा, (इ) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (ई) फळ विक्रेता.



(२)              खाली नमूद खाजगी संस्था, कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत बाळगण्याच्या अटीवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजल्यापासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. लसीकरण व RT-PCR  चाचणी विषयक नियम दि. 10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. आवश्यक ते प्रमाणपत्र सोबत नसल्यास संबंधीताकडून 1 हजार रूपये दंड आकरण्यात येईल. 



(अ) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉजिटर्स व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स व SEBI  कडे नोंदणीकृत असलेले एजंट. (ब) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediaries including standalone primary dealers), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इं‍डिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर, RBI  ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार. (क) सर्व नॉन बॅकिंग वित्तीय महामंडळे (ड) सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (इ) सर्व वकील यांची कार्यालये (फ) लस / औषधे / जीवनरक्षक औषधे संबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाऊस एजंट / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स.



(३)              ज्या व्यक्ती सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत रेल्वे/बसेस/विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकीट सोबत बाळगणे बंधनकारक असेल. जेणेकरून संबंधित व्यक्ती संचारबंदी कालावधीत स्थानकापर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.



(४)              औद्योगिक कामगारांना / कर्मचारी यांना खाजगी बस /खाजगी वाहनाने त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत कामाच्या वेळेनुसार प्रवास करण्यास परवानगी असेल.



(५)              जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. परंतु त्या ठिकाणी सुरू असलेल्या नित्यनियमाच्या धार्मिक पूजा अर्चा यांना परवानगी असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार संबंधित पूजा, प्रार्थना यांना लग्न समारंभ व अंत्यसंस्कार यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.



(६)              परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस सदर परिक्षेस व्यक्तीश: उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशावेळी परिक्षेच्या ठिकाणाहून सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यानंतर व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. तथापी, या कालावधीत परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.



(७)              शनिवार, रविवार या संचारबंदी कालावधीत विवाह समारंभ असल्यास कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर सदर विवाह समारंभास परवानगी असेल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया/बाबी कायम राहतील.

           



 सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी, आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचचांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.  हा आदेश दि. 6 एप्रिल 2021 पासून दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश दिले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here