जाडरबोबलाद मध्ये दिवसाढवळ्या घर फोडले

0



माडग्याळ, संकेत टाइम्स : जाडरबोबलाद ता.जत येथील श्रीशैल सोमनिंग पुजारी यांच्या घरात दिवसा ढवळ्या चोरीची घटना घडली असून यात 80 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.



श्रीशैल पुजारी याचे जाडरबोबलाद ते उटगी रस्त्यावर घर आहे.मंगळवारी घरातील कुंटुबिय कार्यक्रमासाठी गावी गेले होते.तर श्रीशैलचा भाऊ देवराज पुजारी हा दुपारी 12.30 च्या सुमारास दुचाकीला पेट्रोल आणण्यासाठी घराबाहेर गेले होते.



Rate Card

यांचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोंखडी कपाट तोडून सोन्याची चैन,अंगठी,कानातील फुले,जुबे असे सुमारे 2 तोळे सोने,रोख पाच हजार रूपये असा सुमारे 80 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.घटनास्थळी सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर व हवलदार राम बन्नेनवर यांनी पाहणी करून पंचनामा करत‌ तपास सुरू केला आहे.

जाडरबोबलाद ता.जत येथील श्रीशैल पुजारी यांच्या घरातील कपाट चोरट्यांनी असे फोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.