दरिबडची, संकेत टाइम्स : राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेशाला जत समिश्र प्रतिसाद मिळाला.संख,माडग्याळ, उमदी वगळता अन्य गावात बंद पाळण्यात आला नव्हता.तर जत शहरात आठवडा बाजार भरल्याने बंद करण्यासाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना खाली हात माघारी फिरावे लागले.
या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. शासनाने 30 एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी संकटात आले आहेत. शासनाने वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू ठेवायला हवी होती. पुढे सण आहेत. व्यापाऱ्यांनी माल भरला आहे.त्याच्या रकमेची परतफेड करायची आहे.व्यापार बंद राहिल्यास परतफेड कशी करणार, असा सवाल आहे. त्यामुळे व्यापारी आणखी संकटात येणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.
शासनाने लॉकडाऊनचा आदेश काढून व्यापा-यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आदेशात सोमवार ते शुक्रवार रात्रीपर्यंत कडक निर्बंध लावली आहेत. या दिवसातही दुकाने बंद राहणार आहे. शासनाचा लॉकडाऊन आदेश हा व्यापा-यांसाठी ‘डेथ वारंट’च आहे. यामुळे अनेक व्यापारी आत्महत्या करतील.सणांच्या काळात लादलेला लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या जीवावर बेतणार आहे. सरकारने आदेश मागे घ्यावा.पूर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने व्यापाऱ्यांना काहीही मदत केली नाही, उलट चक्रवाढ व्याज लावून कर्ज वसूल केले. शिवाय आयकर रिटर्नमध्येही काहीही सूट दिलेली नाही. विजेचे बील, कर्मचाऱ्यांचा पगार, बॅकांचे हप्ते भरावे लागले. पुढेही अशीच स्थिती निर्माण होणार आहे.
सराफ व्यापारी प्रकाश बंडगर
म्हणाले, शासनाचा 30 एप्रिलपर्यंतचा दुकाने बंदचा आदेश व्यापाऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. आधी कोरोना संपणार का, आधी व्यापारी, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याचा सण 13 एप्रिलला आहे. सर्वांनी दागिन्यांचे ऑर्डर दिले आहेत. आता त्याचे काय होणार, असा गंभीर प्रश्न आहे.
जत शहरात मंगळवारी सायकांळी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आवाहनानुसार दुकाने बंद करण्यात आली होते.