एस.आर.प्रोडक्शन जतची मराठी वेब सिरीज लवकरचं

0जत,संकेत टाइम्स :  एस.आर.प्रोडक्शन जत,या निर्मिती प्रोडक्शन संस्थेच्या वतीने जत येथून लवकरचं एक मराठी वेब सिरीज सुरू करण्यात येणार आहे.त्यासाठी विविध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत.ऑडिशन कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य दिनकर पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

 यावेळी दिनकर पतंगे म्हणाले की, जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत.त्यांना या वेब सिरिजच्या माध्यमातून आपल्या कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. कलाकारांनी या वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, मोठ्या चित्रपटात भाग घेऊन आपल्या कला जनतेसमोर सादर कराव्यात. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक यांचे वतीने कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व कलाकारांना सोशल डिस्टनचा वापर करत कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित सर्व कलाकारांना मास्कचे वाटप करण्यात आले. चित्रपट महामंडळाचे रीतसर सभासद होणे व चित्रपट महामंडळाचे ओळखपत्र सोबत ठेवणेचे आवाहन करणेत आले.ऑडिशनच्या वेळी जवळपास 60 कलाकारांनी भाग घेतला.

Rate Cardजतसह,सांगली कवठेमंकाळ, तासगाव,सांगोला,पंढरपूर,इथून कलाकार  आले होते.या जत तालुक्यात कलाकारांना चांगली संधी निर्माण करून देण्याचे श्रेय एस.आर.प्रोडक्शनचे मॅनेजर सरताज नदाफ,रोहित पवार,यांचे आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिनेते,कवी,गायक एम.जगदीश उर्फ सहदेव माळी यांनी केले,व श्री पुकार आवटी आभार मानले.जत‌ येथे एस.आर.प्रोडक्शन जतची मराठी वेब सिरीजसाठी कलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.