इस्लामपूरमध्ये उत्पादन शुल्कचा इन्स्पेक्टर ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

0
2

– बियर बारच्या नुतणीकरणासाठी 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

  

– उत्पादन शुल्क विभागात खळबळ





इस्लामपूर : बिअर बारच्या नुतनीकरणासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक शहाजी आबा पाटील यांना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.


    



याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचे परमिटरूम बिअर बार आहे. या बारच्या नुतणीकरणासाठी उत्पादन शुल्क विभागाचे पाटील यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची पडताळणी केली. 





त्यानंतर आज सापळा लावण्यात आला. त्यामध्ये उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी पाटील यांना तक्रारदाराकडून तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here