कोरोना वाढतोय,गंभीर व्हा ! | प्रशासन कधी होणार गंभीर | पोलीस,नगरपरिषद ‌अजून हालेना

0जत,संकेत टाइम्स : गत तीन दिवसातच जत तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही सत्तरी पार झाली आहे तर कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. जत तालुक्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असतानाही तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांना याचे कोणतेच गांभीर्य दिसत नाही. असे जर चालू राहिले तर जत तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही. तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन व जत नगरपालिका यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने तालुकावासियांची चिंता वाढली आहे. 

जत तालुक्यात आजपर्यंत 2336 जणांना कोरोनाची लागण झाली असून  यापैंकी 2114 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे तालुक्यातील 77 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. 

सद्या जत तालुक्यात कोरोनाचे 146 रूग्ण असून त्यापैकी 9 जण जत कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणा मध्ये एकूण 121 रूग्ण उपचार घेत आहेत.मिरज सांगली येथे उपचारासाठी गेलेले रूग्ण हे 16 आहेत. जत तालुक्यातील बिळूर हे गांव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले होते. त्यानंतर तालुक्यातील काशिलिंगवाडी हे गांव कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे. तर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत होत असलेल्या नागरिकांच्या तुफान गर्दी, वाहतूक कोंडी व कोरोनाचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याकडे होत असलेल्या प्रशासन’ पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहेत.


Rate Card


प्रमुख बाजारपेठेत विविध प्रकारचे व्यवसाय करणारे व्यवसाईक हे कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करताना दिसत नाहीत. या व्यवसाईकांच्या तोंडाला मास्क लावलेले नसतात.तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात येत नाही. सोशल डिस्टन्सिंग च्या बाबतीत तर हे व्यवसाईक पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याचे अधिकार तालुका प्रशासन अधिकारी ,पोलीस प्रशासन अधिकारी व जत नगरपरिषद यांना असतानाही ते याकडे गांभीर्याने पहाताना दिसत नाहीत.


त्यामुळे नागरिकही बेफिकीरीने वागत असून याचा परिणाम कोरोना वाढीवर होत आहे.शहरात गत तीन चार दिवसात राजकिय नेते, जिल्हापरिषद सदस्या, अडत व्यापारी, कापड व्यापारी, सराफ व्यवसाईक तसेच वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ह्या कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्या असून येथील आरोग्य  विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवत आहेत.परंतु यातील बहुतांशी रूग्ण हे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यानी दिलेल्या सुचनांचे पालन करताना दिसत नाहीत. 


यापैकी बहुतांशी रूग्ण हे पाॅझिटीव्ह असतानाही शहरात फिरताना दिसत आहेत ही गांभीर्याची बाब आहे. तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती रूग्ण संख्या विचारात घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनाने जत तालुक्यात ऑक्सीजन  बेड व व्हेंटीलेटरची त्वरित व्यवस्था करावी व कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा जत शहर व तालुका वासियांतून करण्यात येत आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.