बेफिकीर नागरिक,प्रशासनाच्या दुर्लक्षाने जतेत कोरोना कहर | दररोज 25 पेक्षा जादा नवे पॉझिटिव्ह रुग्ण

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात शुक्रवार ता.2 ला पुन्हा नवे 28 रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या चार दिवसात जत शहरात वाढलेले रुग्ण चिंता वाढविणारी आहे.जत शहरात 17 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर वाळेखिंडी 1,बनाळी 3,उटगी 3,बोर्गी बु. 2,संख 1,डफळापूर 1 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.


तालुक्यात एकीकडे कोरोनाचा फैलाव वाढत असताना यावर नियंत्रण आणणारी यंत्रणा कोमात गेली आहे. त्यामुळे काही बेफीकीर नागरिकांमुळे दक्ष नागरिकांवरही संकट कोसळणार आहे.

Rate Card


तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 2364 झाली आहे.तर 2124 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यात 164 जण उपचाराखाली आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.