कवटेमहांकाळ : कवटेमहांकाळ तालुक्यात पुन्हा एकावर खूनी हल्ला झाला आहे. बोरगाव येथील घटनेनंतर तिसऱ्या दिवशीच पिंपळवाडीचे माजी संरपच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर(वय 25)या दोन अज्ञात हल्लेखारांनी भोकसले आहे.शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान कवटेमहांकाळ मधील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौक ही घटना घडली आहे. हल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय माने हा सुध्दा जखमी झाला आहे.
आटपाडकर यांच्यावर अनेक वार करण्यात आल्याने त्याला उपचारासाठी कवटेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयातून मिरजला हलविले आहे.दरम्यान पिंपळवाडीचे माजी संरपच खोत यांचा आटपाडकर भाचा असल्याने पुन्हा कवटेमहांकाळ अंशात झाले असून खळबळ माजली आहे.