कुडणूर(जत)गावाचा यादवकालीन इतिहास | शिलालेख आढळला | सिंगणापूरमधील तीन देवांना जमुना दान दिल्याचा उल्लेख

0



डफळापूर,संकेत टाइम्स

——————————

श्री.हनुमान देवस्थानमुळे तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या कुडनूर ता.जत गावाची पुन्हा इतिहास कालीन माहिती समोर आला आहे.नुकताच साडलेल्या यादवकालीन शिलालेखात अनेक माहितीचा उल्लेख आढळून आला आहे.यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे.या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपूर्वी सदर संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. हा लेख मारुती मंदिराशेजारील रस्त्याशेजारी भंगलेल्या अवस्थेत होता.







जत तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. तालुक्यात चालुक्यकालीन आणि यादव कालीन काही शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखांवरुन जत तालुक्याच्या सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गेली काही वर्षे जत तालुक्यातील शिलालेखांवर अभ्यास करीत आहेत. 







यामध्ये त्यांना जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुडनूर गावी मारुती मंदिराच्या पश्चिम बाजूस असलेल्या रस्त्यालगत भंगलेल्या अवस्थेतील शिलालेख आढळून आला. कुडनूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतिश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी सदरचा शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती.


Rate Card






सदर शिलालेखाचे दोन भाग झाले होते. सदर शिलालेखावर वरच्या बाजूला गाय, सुर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहे. इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी सदर लेख उतरुन घेऊन त्याचे वाचन तज्ञांकडून करवून घेतले* . या शिलालेखात एकूण नऊ ओळी असून, वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. *सदर लेखात सिंगणापूर येथील श्री सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंघणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.







सध्याच्या कुडनूर गावाजवळच सिंगणापूर नावाचे गांव असून, या गावात असलेल्या महादेवांच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र, सध्या अशा नावांची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत.* अक्षरांच्या वळणावरुन आणि लिपीवरुन *हा लेख उत्तर यादव काळातील असावा. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादवराजा सिंघण याच्या नावावरुन स्थापन केलेल्या मंदिराचे असावे. जत तालुक्यात सिंघणहळ्ळी आणि सिंगणापूर अशी गावांची नांवे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरुनच असावीत.








कुडनूर हे गाव दोन ओढय़ांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोडय़ा अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ सिंगणापूरलगत संबंधीत तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडनूर गावाच्या हद्दीत आला असावा.*

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.