जत,(संकेत टाइम्स) : जत तालुक्यात कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या तालुक्यातील आशांचा गौरव कार्यक्रम शनीवारी लाल बावटा संघटनेकडून बचत भवन येथे घेण्यात आला होता.कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधीसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते.मात्र कोरोना योध्दा म्हणून स्व:ताला मिरविणाऱ्या अधिकाऱ्यांना समाजाच्या वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या शेवटच्या घटक असणाऱ्या आशांच्या गौरव कार्यक्रमासाठी वेळ मिळू नये यापेक्षा या तालुक्यात दुसरे दुर्देव्य नसेल,अशा काहीशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.
चौविस तास सेवा देण्याचा नियम असणारे एकही अधिकारी शनिवारी जत तालुक्यात उपस्थित नव्हते.त्यामुळे एकादी मोठी घटना घडली असतीतर..विचार न केलेला बरा.. जत तालुक्यात कोरोनात काळात खऱ्या अर्थाने स्व:ताच्या जिवासह कुंटुबातील लहान बाळांसह सदस्यांचा जीव धोक्यात घालून या आशांनी प्रभावी काम केले आहे.
त्यांचा गौरव करावा,याचेही भान तालुक्यातील राजकीय, सामाजिक पक्ष,संघटना,संस्थाना राहिलेले नाही.त्यापलिकडे आज कहर झाला.आशासाठी एकाकी लढणारे कॉ.हणमंत कोळी यांनी लाल बावटा आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनच्या वतीने जत शहरातील बचत भवन येथे आशाचा सत्कार व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.
विशेष करून पक्ष विरहित झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार विक्रमसिंह सांवत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र तालुक्यातील एकही अधिकारी या कार्यक्रमासाठी नियंत्रण देऊन उपस्थित नव्हता,अशा संवेदनाहिन अधिकाऱ्यांच्या विरोधात यावेळी संताप व्यक्त होत आहे.