जत,(संकेत टाइम्स वृत्तसेवा) : जत तालुक्यातील 29 गावांची मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी सचिन पाटील यांनी जय्यत तयारी केली आहे. याला व्होटिंग मशीनमुळे गती मिळणार आहे. काही मिनिटांत विजयाचा गुलाल कोणावर पडणार आहे याची माहिती मिळणार आहे. ही मतमोजणी जत शहरातील गोडावून नं.2 मध्ये आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींपैकी 1 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.277 जागांपैकी 31 जागा बिनविरोध झाल्या आहेत.29 गावांतील 101 प्रभागातून 277 ग्रामपंचायत सदस्य निवड होणार आहे. यासाठी 572 उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.15 टेबलची रचना करण्यात आली आहे.150 अधिकारी/कर्मचारी नेमण्यात आले आहेत.मतमोजणीच्या 8 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. निवडणूक निरिक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी प्रंशात आवटे या निवडणूक आयोगाने नेमणूक करण्यात आली आहे.
शुक्रवारी 83.55 टक्के एवढे मतदान झाले असून,22 हजार 332 स्त्री, तर 25 हजार 363 पुरुष अशा 47 हजार 695 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.29 ग्रामपंचायतींसाठी आठ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. व्होटिंग मशीन असल्याने प्रत्येक गावांचा निकाल काही मिनिटांत मिळणार असून, कोणाची सत्ता येणार आहे हे कळणार आहे. काही व्यत्यय नाही आला, तर दुपारच्या आतच सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.
अशा होणार फेऱ्या व गावे
• पहिली फेरी : उमराणी,वळसंग
• दुसरी फेरी : शेगावं, गुगवाड, येळदरी
• तिसरी फेरी : उटगी,मेंढेगिरी
• चौथी फेरी : अंकले, कुडणूर,अंकलगी, भिवर्गी
• पाचवी फेरी : डोर्ली, धावडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सनमडी
• सहावी फेरी : घोलेश्वर, गुड्डापूर, सिध्दनाथ, जाल्याळ खुर्द, करेवाडी (ति)
• सातवी फेरी : तिकोंडी, कुलाळवाडी,मोरबगी, सोनलगी, निगडी बुद्रुक
• आठवी फेरी : लमाणतांडा (द.ब), लमाणतांडा (उटगी