पवनऊर्जा कंपनीविरोधात बेंळूखीतील नागरिक करणार ठिय्या आंदोलन

0



डफळापूर,(संकेत टाइम्स वृत्तसेवा) ; बेंळूखी ता.जत येथे एका पवनऊर्जा कंपनीने सर्व नियम ढाब्यावर बसवून पवनचक्की उभारण्याचे काम सुरू केले आहे.गावातील नागरिकांचा विरोध असतानाही पोलिस बळाचा वापर करून धमकावले जात आहे.





पवनऊर्जा कंपनीला उभारणीसाठी केंद्राच्या हरितलवादाने अनेक नियम घालून पवनचक्की पोजेक्ट उभारणी करण्यास परवानगी दिली आहे.तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामपंतायतीकडून देण्यात आलेला परवाना रद्द करावा म्हणून ग्रामपंचायतीत ठरावही घेण्यात आला आहे.कंपनीने शासनाचे सर्व नियम ढाब्यावर बसविण्यात आले आहेत.


Rate Card






अनेक कामे बेकायदा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात गावातील नागरिकांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.याबाबत संबधित विभागाकडे गावातील नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. तरीही कंपनीकडून दबाव टाकून काम सुरू केले आहे. ते थांबवावे या मागणीसाठी आता नागरिक कंपनीच्या पोजेक्टजवळ बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.