संखच्या लक्ष्मीचे मिळाले जीवदान |सांगलीच्या डॉ.अविनाश पाटील यांच्या प्रयत्नाना यश

0सांगली :डॉ.अविनाश पाटील यांनी त्वचा रोपण करून लक्ष्मी या बालिकेला वाचवले.संख ता.जत येथिल 65 टक्के भाजलेल्या दोन वर्षांच्या लक्ष्मी माळी या बालिकेला प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. अविनाश पाटील यांनी जीवनदान दिले. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजलेल्या रुग्णला वाचवण्याचा हा विक्रम असल्याचा दावा त्यांनी केला.

रोटरी क्लबच्या मदत तिनी सांगलीत उभारलेल्या त्वचा(स्किन) बँक मुळे हे शक्य झाले आहे,असेही डॉ.पाटील यांनी सांगितले


संख येथील लक्ष्मीच्या अंगावर उकळले पाणी पडल्याने 65 टक्के गंभीर भाजली होती.भाजलेल्या भागातून रक्तस्त्राव सुरू होता.रक्तातील प्लाझ्मा शरीरातून बाहेर पडत होते.त्यामुळे तिची रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत होती.जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची व सेप्टिसेमीची शक्यता होती. त्यामुळे भाजलेल्या भागावर त्वचा रोपण करण्याचा निर्णय घेतला.रोटरी त्वचा बँकेतील त्वचा लक्ष्मीच्या भाजलेल्या जागेवर पाचव्या आणि सहाव्या दिवशी लावण्यात आली. ते म्हणाले, भाजलेल्या जागेवर त्वचा लावल्यामुळे जखमेतून येणारे रक्त थांबले आणि प्लाझ्मा वाया जाणेही थांबले. शिवाय तिच्या वेदनाही थांबून त्वचाच्या आवरणामुळे जंतूंचा प्रादुर्भाव रोखला गेला हे करताना महागडे सलाइन,जास्त शक्तची प्रतिजैविक वापरण्याची गरज पडली नाही.गंभीर पणे भाजली असतानाही 29 दिवसात बरी होऊन तिला घरी पाठवण्यात आले.


Rate Card
त्वचा वापरून 19  जणांच्या जखमा बऱ्या डॉ.अविनाश पाटील म्हणाले, त्वचा बँक मुळे आजवर 50 टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या पाच बालकांना जीवनदान मिळाले आहे. तर 19 रुग्णाच्या जखमा वेदना रहित बऱ्या झाल्या आहेत.2018 मध्ये या बँकेची सुरवात झाली. आजपर्यंत 11 लोकांनी त्वचादान केली असून ती ठेवण्याची खास व्यवस्था या बँकेत केली आहे. ही त्वचा बँक महाराष्ट्रातील चवथी व देशातील आठवी बँक आहे,असे ही डॉ.अविनाश पाटिल यांनी यावेळी सांगितले.


उपचारानंतर ठणठणीत झालेली लक्ष्मी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.