शिक्षक बँकेला सत्ताधाऱ्यांनी लुटले | दिलिपकुमार हिन्दुस्तानी ; शिक्षक समितीला यावेळी हटवा
बालगाव,वार्ताहर : शिक्षकांची बँक असलेल्या शिक्षक बँकेला समितीच्या कारभाऱ्यांने लुटले असून शिक्षक
हितापेक्षा संचालकांनी स्व:हिताला प्राधान्य दिले असून शिक्षक सभासदाचा गळा दाबून कारभार करणाऱ्यांना यावेळी हाकला,असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलिपकुमार हिन्दुस्तानी यांनी दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना केले.
हिन्दुस्तानी यांनी यंदा बँकेच्या निवडणूकीत मागासवर्गीय शिक्षक संघटना परिवर्तन घडविणार असल्याचेही सांगितले.
हिन्दूस्तानी म्हणाले,शिक्षकांची शिखर बँक असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेची गेल्या दहा वर्षापासून सत्ता समितीच्या हातात आहे.सत्ता समितीकडे गेल्यापासून शिक्षक व्याज भरुन त्रस्त झालेले आहे.बँकेत निवडून येणाऱ्या सदस्याची वैयक्तिक कर्जमुक्ती होते,असे कसे कर्जमुक्त केले जाते हा संशोधनाचा मुद्दा आहे.गेल्या दहा वर्षातील संपुर्ण कारभार संशयास्पद आहे.100 टक्के वसूली असतानाही सत्ताधाऱ्यांनी काहीही केलेले नाही.

यंदाच्या निवडणूकीत आमच्या पँनेला सत्ता द्यावी बँकेतील भानगडी बाहेर काढून शिक्षकांच्या हिताचा कारभार करू,त्याचबरोबर कर्जाचे व्याजदर कमी करून 9 ते 10 टक्क्यावर आणू तसेच जूनी हक्क कर्मचाऱ्यांना पेन्शन कर्ज मिळाले पाहिजे,यापुढे बँकेतील कर्मचारी भर्ती,अतर्गंत साहित्य खरेदी रितसर वृत्तपत्रात जाहीराती छापूनच काढू,असा पारदर्शी कारभार करण्यासाठी माझ्यासह मागासवर्गीय संघटनेचे पँनेल यावेळी ताकतीने बँक निवडणूक लढविणार असल्याचेही हिन्दुस्तानी यांनी सांगितले.
यावेळी संतोष काटे,प्रल्हाद हुवाळे,भंडारे सर,मल्लेशेप्पा कांबळे,सुनिल सुर्यवंशी यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.