जत,प्रतिनिधी : महात्मा बसवेश्वारांचे ऐक्य क्षेत्र,लिंगायत धर्म क्षेत्र कूडलसंगम येथे ता.12 ते 14 जानेवारी 2021पर्यंत 34 वा शरण मेळावा होत आहे,या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रीय बसवदलाचे अध्यक्ष एम.जी.काराजनगी यांनी केले.
काराजनगी म्हणाले, 12 तारखेला सकाळी राष्ट्रीय बसवदलांचा 30 वे अधिवेशनाचे बसवस्वामीजी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.माताजी पुस्तकाचे लोकार्पण महिला व बालकल्याण मंत्री शशीकला जोल्ले यांच्या हस्ते केले जाणार आहे.यावेळी कृषीरत्न,शरणदासोह रत्न,शरणसेवा रत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे.
दुसऱ्या सत्रात धर्मगोष्टी चिंतन कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अरविंद बेल्लद यांच्याहस्ते होणार आहे.जय बसव मृत्यूजंय स्वामीजी,मडीवाळेश्वर स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य असणार आहे.
ता.13 जानेवारीला मुरघाराजेंद्र,डॉ.शिवमुर्ती मुरघा शरण व उपमुख्यमंत्री गोविंद कारवे हे उपस्थित असतील तर इलकल गुरू महांत स्वामीजी यांच्याहस्ते बसव ध्वजारोहण होणार आहे.
ता.14 जानेवारीला लिंगायत धर्म संस्थापक दिनानिमित्त सामूहिक प्रार्थना,सामूहिक ईष्टलिंगार्चन,गुरूवंदन,वचन पठन,व तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम होईल.
या तिन्ही दिवशी ईष्टलिंग दिक्षा,प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम,योगासन शिबीर,नृत्यगायन,इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.जगत् गुरू माता गंगादेवी,चन्नबसवानंद स्वामीजी, बसवप्रभू स्वामीजी,महादेश्वर स्वामीजी,सत्यवती माताजी,प्रभूलिंग स्वामीजी,यांचे बसवविचारावर्ती प्रवचन व दररोज पहाटे योग प्रशिक्षक योगगुरू डॉ.कल्याणमं यांच्याकडून योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील भक्तांनी लाभा घ्यावा,असे आवाहन काराजनगी सर यांनी केले आहे.