जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.घरफोडी,बंद शाळाचे गोडावून,ऑफिस,शेती साहित्य,विहीर,कुपनलिकातील विद्युत मोटारी,स्टार्टर,एकट्या महिलांना लुटण्याचे प्रकार दररोज घडत आहेत.आतापर्यत बागेवाडी,येळवी रोडवर एकट्या महिलांना चारचाकी गाडीत बसवून चाकूच्या धाकाने सोन्या,चांदीचे दागिणे लुटण्याचे गंभीर प्रकार गेल्या महिन्यात घडले आहेत.
या घटनेचा छडा लावण्यात जत पोलीस अपयशी ठरले आहेत.तालुक्यातील दररोज दहा गावात अशा चोऱ्याचे प्रकार घडत आहेत.अडचणीतील,ओढ्या काठावरील विहिरी,बोअरवेल्समधून मोटारी काढून नेहणाऱ्या चोरट्याच्या टोळ्या तालुक्यात कार्यरत झाल्या आहेत.दररोज 10-20 जणांच्या मोटारी चोरून नेहल्या जात आहेत.
याबाबत पोलीसात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा हेळसाड केली जात आहे.मोटारीचे बिल आहे का ?,कोठे ठेवला होता मोटार?,वीज बंद का केला?,चोरीलाच कशी गेली असेल,चोरट्याला पकडून आणा?तक्रार करून काही उपयोग नाही, अशा प्रश्नाचा ठाण्यातील पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांना भडीमार करातात.केसेही दाखल करून घेतल्या जात नाही.मोटारी चोरीच्या ज्या केसेस दाखल झाल्या आहेत.त्यांचे गेल्या पाच वर्षापासून तपास रखडले आहेत. पोलीसांना शेतकऱ्यांच्या साहित्य चोरीचे तपास करण्याची गरज वाटत नसल्याचे एका शेतकऱ्यांने सांगितले