1 काेटी पीककर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी 71 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

0



औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लोहगाव जवळच्या चार गावात बँक आँफ महाराष्ट्र बिडकीन शाखेच्या तात्कालिन आधिकारी, कर्मचारी,‌स्थानिक दलालच्या संगणमताने बोगस कागदपत्रे जोडून एक कोटी नऊ लाख एकाहात्तर हजार रूपये बोगस पीककर्ज वाटप केल्याचा घोटाळा उघड झाला आहे.







या प्रकरणी जबाबदार 71 शेतकऱ्यांवर ऐन ग्रांमपचायत प्रचार कालावधीत गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तीन गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या पॅनल प्रमुख उमेदवारांना प्रचारासाठी यामुळे आयता‌ मुद्दा मिळाला आहे.




Rate Card






मुलानीवाडगाव, ढाकेफळ, औरंगपूरबुट्टेवाडी,तारूपिपंळवाडी येथील शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी नंतर खरीप हंगामासाठी बिडकीन बँक आँफ महाराष्ट्र शाखेकडे पीक कर्ज मागणी वरून तात्कालीन शाखाधिकारी, धिरजकुमार,कर्मचारी स्थानिक दलाल नेते यांच्या साखळीने 71 शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी बनावट ऑनलाईन बोगस,सातबारे, इतर कागदपत्राचा वापर करून 1 कोटी नऊ लाख 71 हजार रूपयाचे कर्ज वाटप घोटाळा केल्याचा प्रकार बँकेच्या तपासणीत समोर आला होता.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.