जत | तालुकाभर अवैद्य धंद्याना उधान | विभागीय कार्यालय, 2 ठाणी,मोठा कर्मचाऱ्यांचा ताफा तरीही बेधडक मटका,जूगार,वाळू,चंदन,गांज्या तस्करी

0
5



जत,प्रतिनिधी : जत व उमदी पोलीस ठाण्याच्या अर्थपुर्ण आशिर्वादाने तालुकाभर अवैध धंद्यांना ऊत आला आहे.गुंडाराज,अवैध दारू,मटका,सिंदी,जुगार,बेकायदा वाहतूक,गांज्या,वाळू,चंदन तस्करी यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरु असून याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी लक्ष द्यावे,अशी मागणी नागरीकातून होत आहे.जत,उमदी परिसरातील अनेक गावे सांगली पासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत.









त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत.जत व उमदी पोलिस ठाणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे.मात्र याकडे लक्ष न देता येथील अधिकारी व पोलिस कर्मचारी ‘वरकमाईला’ सोकावले आहेत.नव्याने वसूली कलेक्टर नेमणून अवैध धंद्यावर अधिकाऱ्यांनी कमांड ठेवत चांगलाच अर्थ लाभ करून घेण्यास सुरूवात केली आहे.महिन्याकाठी लाखो रुपये गोळा केले जात आहेत.त्याच्या बदल्यात अवैद्य धंद्यांना एकप्रकारे परवानाच दिल्याची स्थिती आहे.





मटका जोमात :
जत व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे.दोन्ही पोलीस ठाण्यातील एक,एक पोलीस कर्मचारी या मटक्यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत.या मटक्या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली काही हजाराचे हप्ते वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास जत,उमदी पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे .







दारू शिंदीचा उंच्छाक

दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याबरोबर हातभट्टी दारू बनावट,पावडर युक्त शिंदीच्या विक्रीने उंच्छाक मांडला आहे.यातून देखील लाखो रुपयांची कमाई होत आहे 




बंद मटका जोमात 

जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम,डिवायएसपी रत्नाकर नवले यांच्या कडक आदेशाने बंद‌ असलेले अवैध धंदे त्यांची नजर चुकवून स्थानिक ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यांने सुरू झाले आहेत. पोलीस निरीक्षकासह सर्वच पोलीस कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत.याकडे पोलीस प्रमुखानी वेळीच लक्ष देवून या लाचखोर पोलिसांचा भांडाफोड़ करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.




बेकायदा वाहतूक सुसाट 


बेकायदेशीर वाहतूक रोकणारे पोलीस हप्ते वसूलीत व्यक्त असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजले आहे.हप्तेबाजीने कोरोनामध्ये बंद असलेला बेकायदा वडाप वाहतून सुसाट सुरू आहे. जनावरांसारखी माणसे कोंबून वडाप होत आहे. हे रोकण्यासाठी नेमलेले कर्मचारी दररोज हाजारो रूपये गोळा करत असल्याचे बेधडक आरोप होत आहेत.तालुक्यातील दोन कर्मचारी वाहतूकीच्या वसूलीवर नेमण्यात आले आहेत.त्यांच्याकडून परराज्यातील वाहनधारकांची लुटीत थेट आमदारांना हस्तक्षेप करावा लागला होता.अन्य जिल्ह्यातून येणारे वाहन त्यांना प्रवृणी असते.दररोज लाखभर रूपयाची माया या दोन कर्मचाऱ्याकडून बेकायदा गोळा केली जात असल्याची चर्चा आहे.






नवे वसूली कलेक्टर

जत,उमदी ठाण्यात कोरोनामुळे व जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम यांच्या कडक आदेशाने पडद्याआड सुरू असलेले अवैध धंदे ‌पुन्हा खुलेआम सुरू आहेत.यात काही जून्या कर्मचाऱ्यांची वसूली कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही ठाण्याचे अधिकारी यांचा छुपा पांठिबा असल्याची चर्चा आहे.





 गंभीर घटनाचे तपास लागेनात

जत‌ तालुक्यात महिलांना लुटणे,हाणामारी,धमक्या,सावकारी, शासनाच्या धान्याची तस्करी, चोऱ्या,दरोडे,खून प्रकरणासह  अनेक गंभीर गुन्ह्याचे तपास रखडले आहेत.त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत.







जतचे पोलीस ठाण्याची दुरूस्ती चर्चेत

जत‌ पोलीस ठाण्यात अनेक शासनाकडून कोणताही निधी आला नसतानाही मोठी बांधकामे, कक्ष,अतर्गंत दुरूस्ती करण्यात आली आहे.ठाण्याला दिलेला नवा लूक कोणत्या योजनेतून दिला यांचीही चर्चा आहे.नव्या अधिकाऱ्यासाठी केबिनचा मुखवटा बदलण्यात आला आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here