भिवर्गीत बेकायदा दारूसाठा जप्त | दोन लाखाचा मुद्देमालासह संशयित ताब्यात
उमदी,वार्ताहर : भिवर्गी ता.जत येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेला दोन लाख रूपयाचा बेकायदा दारूसाठा उमदी पोलीसांनी जप्त केला.याप्रकरणी महमदसो लालसाब सनदी (रा.भिवर्गी)याला ताब्यात घेतले आहे.
जत तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुकाभर अवैध दारूविक्री होण्याची शक्यता आहे.
अशा बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकण्याचे आदेश डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी दिले होते.त्यानुसार उमदी पोलीस ठाण्याचे पथकाकडून असे धंदे शोधण्याचे काम सुरू आहे. भिवर्गी (ता.जत)येथे गाव भागातील महमदसो सनदी यांनी विक्रीच्या उद्देशाने घराच्या पाठीमागे देशी,विदेशी दारूचा बेकायदा दारूसाठा ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली होती.त्याआधारे पथकाने तेथे छापा टाकला त्यात 1 लाख 98,240 रूपये किंमतीचे देशी-विदेशी दारूचे 58 बॉक्स दारूच्या बॉटल आढळून आल्या.
त्या जप्त करून संशयित महमदसो नदाफ यांना पोलीसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर,उपनिरिक्षक नामदेव दांडगे,पो.हे.कॉ.नितिन पलूसकर,श्री.रामगिडे,श्री.गडदे,

माहिती देण्याचे आवाहन..
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावात अशा पध्दतीने बेकायदा दारू साठे असण्याची शक्यता आहे. नागरिकांना अशा दारू साठ्याची माहिती पोलीसांना द्यावी,असे आवाहन सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.
भिवर्गी ता.जत येेथे पकडलेला बेकायदा दारू साठ्यासह संशयिंत आरोपी व पोलीस पथक