संजय कांबळे यांचा आगळगाव येथे सत्कार

0कवटेमहांकाळ : आगळगाव ता.कवटेमहांकाळ येथे‌ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या फंडातून सभागृह, पेग्विग ब्लॉक व कंपाऊड भिंत मंजूर करण्यात आले आहे.ते‌ लवकरचं सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली.

Rate Card

कांबळे यांनी आगळगाव येथे भेट दिली.त्यावेळी या कामासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.गावातील बौध्द समाजाच्या स्मशानभूमी परिसरात झालेले अतिक्रमण काढण्यात यावे,अशाही सुचना यावेळी कांबळे यांनी यावेळी केली.

मंत्री आठवले यांच्या आदेशानुसार कांबळे यांनी आगळगाव येथे भेट दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यापुढे बौध्द समाजातील प्रश्नासाठी आम्ही कठीबंध्द आहोत,असे यावेळी कांबळे यांनी सांगितले.

यावेळी अमोल माने,मधुकर माने, पृथ्वीराज माने, तुळशीराम माने,विठ्ठल माने,पांडुरंग माने, राजाराम माने,भानुदास चंदनशिवे,अमोल मोलमानके,सुधीर माने,शांता कांबळे,तेजल माने ,कुसुम माने,मृणाल सावंत,भाग्यश्री माने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.