जत,प्रतिनिधी : ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था येळवी(ता.जत)या संस्थेने समाजसेवेबरोबर युवा पिढी घडावी, या उच्च महत्वकांक्षेतून लोकसहभागातुन “ओंकार स्वरूपा सार्वजनिक मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाची” स्थापना करण्याचा नववर्षाचा संकल्प/निर्धार केला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची गोडी व्हावी,त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष करून विविध शासकीय/निमशासकीय सेवेमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, पी.एस.आय, एस.टी.आय,तसेच महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती घेण्यात येतात.
त्यामध्ये पोलीस भरती,तलाठी भरती, ग्रामसेवक,तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन खाते,कृषी खाते,आरोग्य, महिला व बालकल्याण यांच्या वरीष्ठ व कनिष्ठ लिपिक, सहाय्यक, पर्यवेक्षक,तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद यांचेमार्फत घेतल्या जाणाऱ्या डीएड/बी एड अभियोग्यता तसेच मेडिकल प्रवेशासाठी लागणारी नीट,त्याचबरोबर आभियांत्रिकीसाठी आयआयटी, याबरोबर साप्ताहिक नोकरी संदर्भ, सैनिक भरती (इंडियन आर्मी),एअर फोर्से भरती, ईंडियन नेव्ही, मर्चंट नेव्ही, एन.डी.ए.विषयक पुस्तके,रेल्वे भरती पुस्तके,
पोस्ट ऑफिसर भरती,आरोग्य सेवक,पशु वैधकीय आधिकारी, एस.टी.महामंडळ भरती, बँकींग क्षेत्रातील विविध संधी विषयक पुस्तके, वन आधिकारी/वन खात्यातील संधी,सेफ्टी अँण्ड फायर मॅनेजमेंट कोर्स विषयी पुस्तके, नर्सिंग क्षेत्रातील संधी, हॉटेल मॅनेजमेंट विषयी पुस्तके, स्कॉलरशीप साठी लागणारी पुस्तके, सैनिक स्कुलसाठी लागणारी पुस्तके, नवोदय विद्यालय परिक्षेसाठी लागणारी पुस्तके, विविध शासकीय योजनांची पुस्तके, याचबरोबर लहान मुलांना वाचनाची आवड व्हावी यासाठी बालपुस्तके ओंकार स्वरुपा ग्रंथालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
ग्रामीण भागात वाचन चळवळ सुरू करून वाचन संस्कृती वृद्धीगत व्हावी. सुजाण नागरिक घडावेत,गरजू युवकांना ग्रंथालयातील पुस्तके देऊन युवकांना वाचनाची आवड निर्माण करू. विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत ग्रंथालय स्थापन करून ज्ञानदानाचे काम सुरू ठेवुन,नक्कीच युवकांचा विश्वास सार्थ ठरवु .गावातील तरुण युवकांनी गावाच्या विकासासाठी हातभार लावावा म्हणून ग्रंथालयाची स्थापना करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी व संस्थेचे सचिव तथा ग्रां.पं.सदस्य संतोष पाटील यांनी सांगितले.
पुस्तके दान (डोनेशन) स्वरूपात देऊ इच्छीत असणाऱ्यांनी व्हाट्सअप – 9130023307/96890 60507 या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन केले आहे.