एमआरपी न देणाऱ्या कारखानदाराचे पुतळे जाळणार ; महेश खराडे

0
5



सांगली : सोनहिरा,उदगिरी व दालमिया वगळता सर्व कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही. कारखानदार लबाड आहेत.तीन जानेवारीपासून लबाड आणि फसव्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे व गाव्हणीत उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली.          खराडे म्हणाले,कडेगाव येथे गत महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदधिकारी व कारखानदारांची संयुक्त बैठक झाली या बैठकीला मोहनराव कदम,विजय पाटील,उमेश जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.त्या बैठकीत सर्वांनी एक रकमी एफ आर पी देण्याचे कबूल केले होते.





मात्र त्यांनी शब्द फिरविला तीन कारखाने वगळता सर्वांनी एक रकमी एफआरपी न देता 2500 रुपये पहिला हप्ता जमा केला आहे.ही शेतकऱ्यांशी गद्दारी आहे. शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याचा प्रकार आहे.या विरोधात आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत.शब्द न पाळणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आणि गव्हणित उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार आहोत.त्याचबरोबर साखर आयुक्तांच्या कडेही तक्रार करणार आहोत.ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसात बिल देणे बंधनकारक आहे,मात्र दोन महिन्यानंतर कारखान्यानी 2500 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.त्यामुळे संघर्ष अटळ आहे                         




असणाऱ्या क्या घरासमोर सद्बुद्धी दे आंदोलन


कडेगाव येथे कारखाना पदाधिकारी उपस्थित होते,मात्र त्यांनी शब्द पाळला नाही.त्याच्या घरासमोर भजन करण्यात येईल, त्यांना सद्बुद्धी दे असे साकडे घातले जाईल,असे खराडे यांनी सांगितले

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here