जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातून रिपाइंचे 30 हजार सभासद नोंदणी करणार असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली.
रिपाई (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पत्रकार भवन पुणे येथे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.डॉ.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे,महा.प्रदेश सरचिटणीस तथा महात्मा फुले विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे,युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परसुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
ना.आठवले म्हणाले,रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष असून लवकरच आपल्या पक्षाला नोंदणीकृत निवडणूक चिन्ह मिळेल.पक्षवाढी करता सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवून सर्वच जाती धर्मातील जनतेला रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत सदस्य करणे महत्वाचे आहे. यापुढे निष्क्रिय पदाधिकारी यांची गय केली जाणार नाही.त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाईल,याची दक्षता घेण्याच्या सुचना सर्व पदाधिकाऱ्यांना केली.
येत्या स्थानिक स्वराज संस्था(महापालिका),नगरपरिषद,
ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. स्थानिक पातळीवर रिपाइंचे उमेदवार निवडणूक आणावेत.सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी तळमळीने काम करावे.
यावेळी सांगली जिल्हा सरचिटनीस सचिन जाधव, कोल्हापूर जिह्याचे नेते सतिश माळगे,सांगली शहर जिल्हाध्यक्ष बापू सोनवणे, वाहतूक आघाडीचे मिरज शहर उपाध्यक्ष सुमित कांबळे, युवक आघाडीचे पलूस तालूकाध्यक्ष अविराज काळबेग यांचे सह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.