ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास मान्यता | बुधवारी 5.30 पर्यत वेळही वाढविली ; जात वैधता प्रस्तावही ऑफलाइन

0



सांगली : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने (Offline Mode) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने  संगणक प्रणालीद्वारे दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. 



ही बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने (Offline Mode)  सादर करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र वाढीव वेळेत स्वीकारावी. नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची स्थानिक पातळीवर प्रसिध्दी देण्यात यावी. 



पारंपरिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO login मधून भरुन घेण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली. 

Rate Card



सांगली : निवडणूक विषयक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेला असल्याने विविध जिल्ह्यातून अर्जदार, लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून याबाबत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृती करण्याबाबत विनंती केलेली आहे.  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुरू असल्याने उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची/जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे प्र. उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी खालीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.



दिनांक 29 ते 30 डिसेंबर 2020 केवळ या दोन्ही दिवशीच अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल/खिडकी वाढवण्यात यावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावीत. 



ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिलेले आहेत त्यांच्यासोबत तक्त्यात माहिती भरून दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत पाठविण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे अनियमितता तसेच गैरकृत्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयाकडे तसेच शासनाकडे अर्जदाराची तक्रार होणार नाही याची दक्षता घेवून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना श्री. भाते यांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.