युवक हल्लाप्रकरणी पाच जण जेरबंद
सांगली : येथील दोघा मित्रातील भांडणातून प्रतिक दिनकर पाटील (वय.29)यांच्यावर
प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी प्रशांत राजकुमार कदम (वय 21),सागर हणमंत पाटील (वय18,दोघे रा. सोनी),तन्वीर रेहमान कामीरकर (वय 23)अक्षय संजय पाटील (वय 21,दोघे
रा. धुळगाव, ता.तासगाव),अक्षय अजीत पाटील (वय 20,रा, सांबरवाडी ता.मिरज)यांना ताब्यात घेतले आहे.
संशयित प्रंशात कदम व जखमी प्रतिक पाटील यांच्यात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून ता.27 दुपारी वाद झाला होता.त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास साखर कारखाना चौक सांगली येथे प्रंशात कदम, सागर पाटील,तन्वीर कामीरकर,अक्षय संजय पाटील,अक्षय अजीत पाटील यांनी लाथा बुक्यांनी मारून चाकू पाठीत,पोटात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
सपोनि काकासो पाटील,उपनिरिक्षक विष्णू माळी यांच्या पथकाने संशयित हल्लेखोराचा तापास करत त्यांना अटक केली आहे.