मुंचडीत शाळेचे संगणक कक्ष,गोडावून फोडले | शालेय पोषण आहाराच्या डाळी,बटऱ्या पळविल्या

0
4



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.घरफोडी,बंद शाळाचे गोडावून,ऑफिस,शेती साहित्य,पाण्याच्या‌ मोटारी,एकट्या महिलांना लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.बागेवाडी,येळवी रोडवर एकट्या वयोवृद्ध स्ञीयांना चारचाकी गाडीत बसवून चाकूच्या धाकाने सोन्या,चांदीचे दागिणे लुटण्याचे गंभीर प्रकार गेल्या महिन्याभरात घडले आहेत.या घटनाचा छडा लावण्यात जत पोलीस अपयशी ठरले असतानाचा पुन्हा मुंचडी ता.जत येथे शाळेचे बंद गोडावून,संगणक कक्ष फोडून डाळीसह बँटऱ्या,डिव्हीआरची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.










मुंचडी ता.जत येथील न्यू इंग्लिश स्कूल बंद असल्याचा फायदा घेत धान्य गोडावून,संगणक कक्षाचे कुलुपे तोडत आतमध्ये प्रवेश करत सुमारे 300 किलो डाळी,संगणकाच्या 20 बँटऱ्या,सीसीटिव्हीचा डिव्हीआर असा सुमारे 34,680 रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेहला आहे.शाळेत शिपाई असतानाही असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बि.जी.महाजन यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.










दरम्यान जत,उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरटे धुमाकूळ घालत आहेत.अनेक घरफोड्या,विहिरीतील मोटारी,शेती साहित्य,मोटारसायकलीची चोरी झालेली आहे.अनेक तक्रारी पुरावे नसल्याने पोलीसांनी तक्रारी दाखल करून घेतलेल्या नाहीत.रब्बीचा हंगाम ऐन बहरात असताना चोरट्यांनी पाण्यातील मोटारी चोरण्याच्या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाला आहे.लोडसेंटिग असलेल्या दिवशी चोरटे धुमाकूळ घालत आहेत.अनेक घटना होऊनही आरोपी सापडत नसल्याने किंबहुना त्यांना पकडण्याची मानसिकता जत पोलीसांची नसल्याचे अनेक वेळा स्पष्ट होत आहे.त्यामुळे या तालुक्याला कोन वाली आहे का नाही ? असा संतप्त सवाल शेतकरी,सामान्य जनता विचारत आहे.









तपासअधिकाऱ्यांना गांभिर्य नाही


तालुक्यात वयोवृद्ध स्ञीयांना लुटण्याच्या दोन गंभीर घटना घडूनही पोलीस सतर्क झाले नसल्याचे वास्तव आहे.या घटनेतील

तपासअधिकाऱ्यांची चोरट्यांना पकडण्याची मानसिकता नसल्याची चर्चा असून त्यांनी विनाअनभुवी दुय्यम कर्मचाऱ्याकडे तपासाची जबाबदारी देत तुम्हीच चौकशी करा म्हणून दबाब टाकण्यास सुरूवात केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.त्यामुळे चोरट्यांना पोलीसांच्या या नाकर्तेपणामुळे बळ मिळत असल्याचे समोर येत आहे.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here