चोरी,घरफोडी गुन्ह्यातील पाच वर्षापासून फरारी आरोपी जेरंबद

0सांगली : पाच वर्षापासून जबरी चोरी,घरफोडी गुन्ह्यातील फरारी आरोपींला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरंबद केले.विकी गोसावी उर्फ विकास संतराम गोसावी(वय 29,रा.वाल्मिकीनगर आवास,सांगली) असे‌ पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.त्यांच्याकडून सांगलीतील सहा घरफोडीचा तपास लागण्याची शक्यता पोलीसाची आहे.

पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांच्या आदेशावरून जिल्हाभर विविध गुन्ह्यातील आरोपींची शोध मोहिम सुरू आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.पथकातील कर्मचाऱ्याला जबरी चोरी,घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित विकी गोसावी हा भरणा नाका खेड ता.रत्नागिरी येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती.त्या आधारे तेथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.


Rate Card

त्याने सांगली शहर,कुपवाड एमआयडीसी,महात्मा गांधी नगर,संजयनगर,पोलीस ठाणे हद्दीत साथीदाराच्या साथीने अनेक जबरी चोरी,घरफोड्या केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे. त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असून अनेक चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे.पो.नि.सर्जेराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज फडणवीस,अभिजीत सांवत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.