आटपाडीतील 16 लाखाचा बकरा पळविला | आलिशान गाडीतून बकऱ्यांची चोरी

0
4



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील 16 लाख रूपयाची मागणी झालेला बकरा चोरीला गेल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे.एका आलिशान गाडीत घालून बकऱ्याची चोरी झाली आहे.आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात मोदी बकरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बकऱ्याला दीड कोटी रुपये दर आला होता.



मोदी बकऱ्याचा वंश असलेल्या आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा 16 बकरा लाखाच्या मागणीनंतर प्रसिध्दीस आला होता.त्याला आटपाडीच्या बाजारात 16 लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी आली होती.परंतु तो विकला नव्हता.या सोळा लाख किंमतीच्या बकऱ्याची शनिवारी मध्यरात्री चोरी झाली आहे. 



एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा पळवून नेहण्यात आला आहे.या बकऱ्याला उत्तरेश्वर देवाच्या यात्रेत जत तालुक्यातील एका बकरा प्रेमीकडून मागणी आली होती.

या बकऱ्यांची माहिती देणाऱ्यास एक लाख रूपयाची बक्षिस देण्यात येईल असे,सांगण्यात आले आहे.

दिवसभरातील अपडेट बातम्यासाठी या लिंकवर सामिल व्हा.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here