आंसगी तुर्कमध्ये बेकायदा दारू अड्ड्यावर छापा | 1 लाख 80 हजाराचा‌ दारू साठा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

0
3



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यातील आंसगीतुर्क येथे बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकत देशी विदेशी दारूचा सुमारे 1 लाख 80 हजार रूपयाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मिरासाहेब मोदिन मुजावर (वय 28,रा.आसंगी तुर्क)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत हि कारवाई केली. 









पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम,अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले,यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे याची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.त्याप्रमाणे दिनांक 26 डिसेंबरला जत तालुक्यातील आंसगीतुर्क येथील बेकायदा दारू विक्री होत‌ असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.त्याआधारे मिरासाब मुजावर यांच्या घराशेजारी छापा टाकला असता,त्यांच्या ताब्यात नॉकआउट पंच कंपनीच्या 650 मिलीच्या बिअरचे 63 बॉक्स किंमत‌ 1 लाख, 51हजार,200 रूपये व नॉकआउट पंच कंपनीच्या 330 मिली बिअरचे 12 बॉक्स किंमत 28,800 रूपये असा एकूण 1,80,000 रूपयेचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संशयित मिरासाहेब मुजावर यांच्यावर दारू बंदी अधिनियम कलम 65 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाणे येथे‌ रिपोर्टने जमा करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‌सहा.पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,जितेन्द्र जाधव,आमसिध्दा खोत,मच्छिंद्र बर्डे,सतिश अलदर,राहुल जाधव,गुदतसर पाथरवट,राजु शिरोळकर बजरंग शिरतोडे,यांच्या‌ पथकाने ही कारवाई केली आहे.








जत पुर्व भागात बोगस दारू येते कोठून


जत‌ पुर्व भागात जवळपास‌ सर्वच गावात बेकायदा देशी-विदेशी दारूचा महापूर वाहत आहे.नेमकी विना परवाना एकदा दारू साठा कोणत्या परवाना धारक दुकानातून येतो यांची चौकशी करून अशा पध्दतीने दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानदारावर कारवाई करावी.संख,उमदी बेकायदा दारू वितरण करण्याचे सेंटर बनले आहे.










उत्पादन शुल्क विभागाची साथ


जत‌ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विकली जात‌ आहे.बेकायदा दारू विक्रेत्याकडे तब्बल दोनदोन लाखाची दारू येते‌ कोठून त्याचा पुरवठादार कोन याची तपासणी करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असतानाही त्याचे अधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करत असून जतचे कार्यालय कुलूपबंद‌ ठेवून सध्या‌ मिरज येथून एवढ्या मोठ्या‌ तालुक्याचा कारभार हाकला जात‌ आहे.या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.









सिंदी,गावठी दारूचे कारखाने


जत तालुक्यातील पश्चिम भागात सिंदीचे,तर पुर्व भागात गावठी दारूचे कारखाने थाटण्यात आले आहेत.या कारखान्याचे चालकच उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांच हप्ते वसूलीचे कामकाज पाहत असल्याने त्यांना उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकप्रकारे परवाना दिल्याचे वृत्त आहे.पावडर युक्त सिंदीमुळे अनेक जणाचे जीव गेले आहेत.तरीही राजरोसपणे सिंदी विक्री केली जात असून पश्चिम भागातील कारखान्यातून तालुकाभर‌ व सीमावर्ती भागात चारचाकी गाडीतून सिंदी पोहच केली जात आहे. त्याशिवाय थेट गावात गावठी दारू काढण्याचे कारखाने उत्पादन विभागाच्या सहकार्याने सुरू झाले आहेत.हे सर्व प्रकार माहिती असतानाही जतचा उत्पादन शुल्क,व प्रभारी अधिकारी हाताची घडी,तोंडावर बोट या अवस्थेत आहे.त्यांच्या नाकर्तेपणामुळे विशेष पथक कारवाईसाठी धाडावे लागत आहे.अशा भष्ट्र,बेजबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here